डॉ.होमीभाभा परिक्षेत सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचे सुयश चि. ओम टेकाडे विदर्भातून दुसरा

डॉ.होमीभाभा परिक्षेत सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचे सुयश चि. ओम टेकाडे विदर्भातून दुसरा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     मुंबई सायन्स टिचर्स असोसिएशन च्या वतीने घेण्यात आलेल्या डॉ. होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षेत सहकार विद्या मंदिर, बुलडाणा येथील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. सदरहु परीक्षा तीन स्तरात होत असुन याचा प्रथम स्तर ऑन लाईन पध्दतीने घेण्यात आला. यामध्ये वर्ग 9 वी चा विद्यार्थी चि. ओम टेकाडे यांने घवघवीत यश संपादन करीत विदर्भातून द्वितीय क्रमांक मिळविला असून वर्ग 6 वी मधून चि. मोहित अग्रवाल व चि. पार्थ तायडे यांनी सुद्धा यश संपादन केले आहे. या तीनही विद्यार्थ्यांची द्वितीय स्तराकरीता निवड झाली आहे.
       द्वितीय स्तराची परीक्षा दि. 30 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर, प्राचार्य व मुख्याध्यापिका यांनी केले असुन त्यांना पुढील परिक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात. विद्यार्थ्यांनी त्याच्या यशाचे श्रेय संस्थेच्या अध्यक्षा, प्राचार्य, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदाना दिले आहे.