येळगाव येथे विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
साखळी जि. प. सर्कल अंतर्गत असलेल्या येळगाव येथे तीन विकासकामांचा लोकार्पण सोहळा 19 जानेवारी 2022 रोजी पार पडला. ग्रामीण भागांमध्ये अंगण परिसरात चालवली जाणारी माहितीकेंद्र म्हणजे अंगणवाडी. अंगणवाडीत महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर दिला जातो. 3 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याचे महत्वाचे काम अंगणवाडी करतात. त्यामुळे अंगणवाडी ह्या ज्ञानमंदिर आहेत.
येळगाव येथे अंगणवाडीची इमारत व्हावी याकरिता जि.प.सदस्य ॲड.जयश्रीताई शेळके यांनी पाठपुरवा केला. जिल्हा परिषद अंतर्गत 8.50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर होऊन येळगाव येथे अंगणवाडी क्र.01 च्या इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले. तसेच जनसुविधा योजनेअंतर्गत 03 लक्ष रुपये व 06 लक्ष रुपयांच्या रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे. या तीनही कामांचे लोकार्पण करण्यात आले. जि.प.अध्यक्ष मनिषाताई पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले. अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या प्रदेश सचिव तथा जि.प.सदस्य ॲड.जयश्रीताई शेळके होत्या. यावेळी पं.स.सभापती उषाताई चाटे, सरपंच सिमाताई माळी, ग्रा.स.दादाराव लवकर, कांताबाई गडाख, कैलास मानमोडे, सुमनबाई साळोक, सविताताई गवई, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष राऊळकर, देविदास खोंडे, गणेश पाटील, जुलालसिंग जाधव, माधवसिंग राजपूत, श्रीकृष्ण गव्हाळे, रतनसिंग राजपूत, सिताराम राजपूत, श्रीकृष्ण राजपूत, किरण खिल्लारे, ब्रम्हानंद गडाख, पंजाबराव गडाख, सुभाष बोकाडे, निलेश राजपूत, बेबीताई खडके, गणेश बोकाडे, गोपाल पठाडे, मधुकर गव्हाळे, नितीन मानमोडे, रामेश्वर मानमोडे, प्रकाश विरशिद, ईश्वर मानमोडे, अभिनंदन जाधव, ग्रा.सचिव गणेश पायघन, अंगणवाडी सेविका यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
