* डॉ.आंबेडकर नगरातील समाज बांधवांनी केला भीम संकल्प
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
भारतीय संविधानाचे निर्माता, शोषित, पिडित बहुजनांचे मसीहा, महिलांचे उध्दारकर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 105 फुटांचा पुतळा शहरातील डॉ.आंबेडकर नगरात उभारण्याचा द़ृढ संकल्प डॉ.आंबेडकर नगरातील समाज बांधवांनी केला असून, या संदर्भात नालंदा बुध्द विहारात 19 जानेवारी 2022 रोजी पार पडलेल्या समाज बांधवांच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला असून, एव्हढा भव्य पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील समाज बांधवांसह नौकरी-व्यवसायानिमित्त विदेशात स्थायीक झालेल्या समाज बांधवांकडून देखील निधी गोळा केली जाणार असल्याचे ही या बैठकीत ठरविण्यात आले. बाबासाहेबांच्या या भव्य पुतळयामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहराच्या सौदर्यीकरणासह वैभवातही भर पडणार आहे. हे निश्चित.
बुलडाण्यातील डॉ. आंबेडकर नगर हे जिल्हयाच्या आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थळ आहे. समाज हिताच्या प्रत्येक चळवळीत येथील रहिवासी महिला व पुरूषांचा मोठा सहभाग असतो. बाबासाहेबांनी तमाम भारतीयांसाठी केलेल्या उत्तुंग कार्याची महती व त्यांच्या कार्याची प्रेरणा बहुजन समाजातील युवापिढीला मिळावी या हेतूने हा संकल्प करण्यात आला आहे. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आशिषबाबा खरात उपस्थित होते. त्यांनी यावेळी बाबासाहेबांच्या पुतळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला प्रदिपभाऊ बोर्डे, रविकिरण मोरे, अॅड. संतोष मिसाळ, संदिप बोर्डे, भारतीय बौध्द महासभेचे शहराध्यक्ष उदय सुरडकर, रविंद्र दाभाडे, सुधाकर आराख, गुलाब खिल्लारे, प्रकाश धुरंधर, अनिल साळवे, जनार्धन सरदार, शाहिर मिसाळ, अभिजित बोर्डे, निलेश मेढे, सागर जाधव, अमोल वानखेडे, रत्नमालाबाई पनाड, शिलाबाई गवई, शांताबाई आराख, कल्पना गवई, लता खिल्लारे, सुजाता लहाने, पुष्पा जाधव आदी उपस्थित होते.
