बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
स्थानिक जुनागाव परिसरातील झोपडपटटीमधील एका घरात जुगार खेळत असलेल्या 12 आरोपींना पोलीसांनी रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवार 18 जानेवारी रोजी घडली. यावेळी पोलीसांकडून एक लाख रूपये रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून जुनागाव परिसरातील झोपडपटटी परिसरातील राजू जाधव यांच्या जुन्या टिनपत्राच्या घरात 12 आरोपी जुगार खेळतांना मिळून आले. यावेळी आरोपी मुकेश रेडडी, शेख सुलतान शेख रहिम, अक्षय अमित सपकाळ, संकेत संजय टेंभीकर, राजेश काशिराम जाधव, राजेश जयराम यादव, राज प्रल्हाद पवार, मुजमिल हुसैन अजहर हुसैन, शेख फारूख शेख अकील, मनोज भिकुलाल भडेच, दिपक प्रकाश सपकाळ, विलास अनिल निकम यांना पोलीसांनी अटक केले. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखालीी स्थागुशाचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांच्या पथकाने केली.
