दिव्यांगासाठी आरक्षित निधीत न.प. अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा* एआयएमआयएमचे डॉ. मोबिन खान यांची पत्रकार परिषदेत मागणी* प्रजासत्ताक दिनी करणार उपोषण

दिव्यांगासाठी आरक्षित निधीत न.प. अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा
* एआयएमआयएमचे डॉ. मोबिन खान यांची पत्रकार परिषदेत मागणी
* प्रजासत्ताक दिनी करणार उपोषण
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     दिव्यांग बांधवांसाठी आरक्षित असलेल्या पाच टक्के निधीमध्ये स्थानिक नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला असून, या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरूध्द कारवाई करा अशी मागणी करून, मागणीची दखल न घेतल्यास 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा एआयएमआयएमचे जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष डॉ. मोबिन खान व अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य सचिव शेख कलीम शेख वजीर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
      स्थानिक पत्रकार भवन येथे 17 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बुलढाणा नपला 2018 मध्ये प्रति दिव्यांगाच्या बँक खात्यात 5000 रूपये अनुदान शासनाकडून देण्यात आले होते. बुलडाणा शहरात 500 ते 600 इतके नोंदणीकृत दिव्यांग आहेत. उपरोक्त अनुदाना व्यतीरिक्त दिव्यांगांना शिलाई मशीन ही आल्या होत्या परंतु न.प. अधिकाऱ्यांनी केवळ शंभर ते दिडशे दिव्यांगानाचं निधीचे वितरण केले. उर्वरीत दिव्यांगांना निधीचे वितरन करण्यात आले नाही. सन 2019-20 मध्ये पाच टक्के प्रमाणे 30 लाख रूपये निधीची तरतूद दिव्यांगासाठी दाखविण्यात आली होती आणि 1 लाख 24 हजार 292 रूपये अतका खर्च 12 लाभधारक अपंगांवर दाखविण्यात आला होता. 2018 ते 2021 दरम्यान पाच टक्के तरतूदी प्रमाणे 85 लाख रूपये दाखविण्यात आले होते. त्यापैकी 3559181 रूपये खर्च दाखविण्यात आला होता. उर्वरीत 4940819 रूपये खात्यात जमा असताना कोरोनाच्या कठीण काळातही हा निधी उर्वरित लाभधारक अपंगांना का वितरीत केला गेला नाही, यावरून या निधीमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीं विरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी डॉ. मोबिन व अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य सचिव शेख कलीम शेख वजीर यांनी केली आहे.