* स्व. अशोकराव चव्हाण यांच्या स्मतिनिमित्त आयोजन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
स्व. अशोकराव चव्हाण यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त भादोला येथे १० डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अडीचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. डॉ. दिपक लद्घड आणि डॉ. रवी मारविया यांनी रुग्णांची तपासणी केली.
दै. 'पुण्य नगरी'चे उपसंपादक संदीप चव्हाण यांचे वडील स्व. अशोकराव चव्हाण यांचे १० डिसेंबर २०२० रोजी निधन झाले होते. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १० डिसेंबर २०२१ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी स्व. अशोकराव चव्हाण तसेच देशाचे सीडीएस बिपीन रावत यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करुन शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. दीपक लद्घड, डॉ. रवि मारवीया, ॲड. जयश्रीताई शेळके, डॉ. अजय खर्चे, सरपंच प्रमोद वाघमारे, उपसरपंच आमिन खासाब, अनिल वायकोस, अनिल इंगळे, वसंतराव निकम, सुभाष सोळंकी, वाल्मिक सिरसाट, संतोष चव्हाण, साहेबराव भगत, श्रीकृष्ण ताकतोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला संदीप चव्हाण यांनी संस्कार, विचार आणि जनसेवेच्या माध्यमातून वडिलांच्या स्मृतिकायम जिवंत ठेवण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून शिबिराच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. तर वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून माणवसेवेच्या प्रत्यक्ष कृतीतून हे अभिवादन असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉ. लद्घड यांनी केले. या शिबिरात डॉ. दीपक लद्घड व डॉ. रवी मारविया यांनी अडीचशेहून अधिक रुग्णांची तपासणी केली व त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले. तसेच ८० रुग्णांचे रक्त नमुने घेऊन शुगर तपासणी करण्यात आली तर ६० रुग्णांचे इसीजी काढून हृदयरोग विषयक विशेष तपासणी करण्यात आली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी संदीप चव्हाण, भारत चव्हाण, किरण चव्हाण, अजय चव्हाण, सुनील नन्हई, राजू इंगळे, आदींनी परिश्रम घेतले.
