बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत दिल्या जाणारा राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्कार पत्रकार संजय निकस पाटील यांना अकोला जिल्हास्तरीय दुसऱ्या साहित्य संमेलनात कविवर्य विठ्ठल वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तरुणाई फाउंडेशनद्वारा आयोजित दुसरे साहित्य संमेलन अकोला येथे स्वर्गीय अरविंद भोंडे साहित्य नगरीमध्ये मोठ्या ऊत्साहात संपन्न झाले. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रत्येक क्षेत्रनिहाय सदर पुरस्कार दिला जातो. संजय निकस पाटील यांच्यासह, पीएसआय कांबळे, संतोष धरमकर, संदीप शेंडे यांनाही युवाभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने आमदार अमोल मिटकरी, जेष्ठ साहित्यिक डॉ. ज.पा. खोडके, प्रा. देवानंद गावंडे डा. सुनंदा जामकर, डाँ. संतोष हुशे, संस्थेचे संस्थापक श्री संदीप देशमुख व मान्यवर ऊपस्थित होते.
