अदिती अर्बन मोबाईल ऍप चे लोकार्पण * अदिती अर्बनच्या वतीने कर्मचारी प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न

अदिती अर्बन मोबाईल ऍप चे लोकार्पण 
* अदिती अर्बनच्या वतीने कर्मचारी प्रशिक्षण वर्ग उत्साहात संपन्न
 बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       महाराष्ट्र राज्य सहकारी संघ महाराष्ट्र पुणे.अंतर्गत जिल्हा सहकारी बोर्ड महाराष्ट्र बुलढाणा व अदिती अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी, महाराष्ट्र, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचारी प्रशिक्षण वर्ग रविवार 12 डिसेंबर  रोजी उत्साहात संपन्न.
      सदर या कर्मचारी वर्ग प्रशिक्षण सत्राची उदघाटनीय सुरवात उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व शक्ती-भक्तीचे प्रतीक असलेल्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. उदघाटनीय मार्गदर्शक डॉ.अशोक खरात ,मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा -जिल्हा केंद्रीय सहकारी बँक म.बुलडाणा म्हणाले की ,संस्थेच्या प्रगतीसाठी उत्कृष्ट व्यवस्थापन असण्यासाठी प्रशासन, संघटन, नियोजन, संप्रेषण, अनुशासन या महत्वाच्या बाबी सर्व कर्मचारी यांनी अंगीकारणे गरजेच्या आहेत.त्याच बरोबर प्रत्येक कर्मचारी यांनी जिज्ञासु वृत्ती जोपासत आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रात त्याचे उपयोजन करून पतसंस्थेच्या ध्येय उद्धिष्ट यांची पुर्तता करून विकासात्मक वाटचाल करणे गरजेचे आहे.आत्मिक समाधानातून केलेले कार्याला यश नक्की मिळत असते.
       सदर या कर्मचारी प्रशिक्षण सत्राचे प्रास्ताविक करताना मनोज डांगे सहा.शिक्षणाधिकारी म्हणाले की, सुरेशजी देवकर यांच्या संकल्पनेतुन निर्माण झालेली अदिती अर्बनची वाटचाल ही शहरी व ग्रामीण भागात यथोचित यशाच्या शिखरावर मार्गक्रमण करत असून "सहकारातून समृद्धीकडे " हा ध्यास घेऊन आज रोजी अथांग समुद्र रुपी सहकार क्षेत्रात दैदिप्यमान दीपस्तंभ ठरत आहे.व सहकार क्षेत्रात काम करत असताना सामाजिक ऋणानुबंध जोपासत आहे हे आपल्या सर्वांसाठी ती अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे.
    अदिती अर्बन चे  संस्थापक अध्यक्ष  सुरेश देवकर म्हणाले की , आज रोजी अदिती अर्बन परिवार हा औरंगाबाद, जालना व बुलडाणा या कार्यक्षेत्रात कर्तव्य-सेवा बजावत असून सामाजिक उत्थानाचे प्रभावी माध्यम ठरत आहे याचे आम्हा सर्वांना आत्मिक समाधान आहे. संपूर्ण विदर्भासह व मराठवाड्यात जनतेची सेवा करण्यास आम्ही कृतिशील वचनबद्द व कटीबद्द आहे.
      अधिनुक काळाची गरज लक्षात घेता अदिती अर्बनच्या सर्व शाखा या पुर्णपणे संगणिकृत असून ग्राहक सभासदांना हायटेक डिजिटल सर्व्हिस चा एक भाग म्हणून यावेळी उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते अदिती अर्बन मोबाईल ऍप, व नवीन दिनदर्शिका चे उदघाटन करण्यात आले.
        दुसऱ्या कर्मचारी प्रशिक्षण वर्ग सत्रात अँड.एस.जी .अरबाळ वसुली अधिकारी अकोला जनता कमर्शियल को.ऑप.बँक.लि.यांनी उत्कृष्ट पतसंस्था चालविण्यासाठी ,संकल्प आणि मोहिम दृष्टीकोन ,संस्थांच्या आर्थिक सशक्तपणा आणि आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्यासाठी विकास कार्यातर्फे सहकार चळवळ वाढविणे. प्रचार राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सहकारी संस्थांना त्यांचा उद्देश व हेतु साध्य करणेकरीता सहकारी संस्था व्यवस्थापन करणेसाठी वाढीव दर्जाचे सेवा देणे. त्यामध्ये सभासदांचा सहभाग व्यावसायिक व्यवस्थापन आर्थिक दूरदृष्टी. सहकाराची सात तत्वे-ऐच्छीक व खुले सभासदत्व, सभासदांचे लोकशाही नियंत्रण, सभासदांचा आर्थिक सहभाग, स्वायतत्ता आणि स्वतंत्रता, शिक्षण प्रशिक्षण व माहिती, सहकारी संस्थांमधील सहकार्य, सामाजिक बांधिलकी आणि महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, कृषी पतपुरवठा बँक कायदा, माहिती अधिकार कायदा 2005, दिवाणी प्रक्रिया कायदा, मुंबई मुद्रांक कायदा,
महाराष्ट्र जमिन महसूल कायदा असे सहकार क्षेत्रातील कायदे, नियम प्रशासन अंमलबजावणी, कर्ज प्रक्रिया, कर्ज वसुली, वसुली विषयक कार्य सूची व अंमलबजावणी अशा सर्व समावेशक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
     यावेळी दिनकरराव चिंचोले कार्यकारी संचालक, सुशील पनाड संचालक,अरुण पाटील लेखानिरीक्षक, शैलेंद्र मुळे सरव्यवस्थापक, अनिरुद्ध गायकवाड मुख्य वसुली अधिकारी, अभिजित पाटील, विभागीय अधिकारी पंकज शेजोळे, मदन निकम, समाधान गवई,समाधान खोंडे, दिपक निकम , प्रदीप पडघान, सुनील कानडजे प्रमुख उपस्थित होते 
     या सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजू वैद्य यांनी केले. प्रा.राहुल हिवाळे मुख्य जनसंपर्क अधिकारी ,आणि अदिती अर्बन परिवारातील एकूण बेचाळीस शाखेतील शाखानिहाय व्यवस्थापक , रोखपाल, लिपिक, शिपाई, चालक वर्ग व स्टेशनरी विभागाचे आदी सर्व कर्मचारी उपस्थित होता.