मोबाइल रुपी रावणापासून आता तरुणाईला वाचवा* राजकुमारी चौहान यांचे प्रतिपादन

मोबाइल रुपी रावणापासून आता तरुणाईला वाचवा
* राजकुमारी चौहान यांचे प्रतिपादन
खामगाव : (एशिया मंच वृत्त)
   रावण हा कुविचारांचा, कुप्रथेचा आणि विद्यार्थ्यांच्या हाती असलेल्या मोबाइल तो ही एक रावणाचे रूपच घेत आहे. प्रत्यक्षात रावणाला दहा तोंडाचा असे संबोधले जाते. मात्र युवकांच्या हाती आलेला मोबाइल हा रावणाचे रूप घेऊन आणि त्याद्वारे तरुणाईला गिळंकृत करत आहे. मोबाइलचा उपयोग फक्त कामासाठी करावा, जेणे करून आपल्याला त्याचा लाभ आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोग होईल, असे आवाहन राजकुमारी चौहान यांनी केले आहे.
    येथील स्व. सौ. मीनाताई जाधव औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शस्त्रपूजन उत्सवा प्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय.टी.आय. निदेशक शेख फय्याज यांनी केले. प्राचार्य राहुल अग्रवाल यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रामप्रसाद धांडे याने तर आभार प्रदर्शन विकास पल्हाडे यांनी केले. कार्यक्रमाला निदेशक अजय उमाळे, अजय घाटे, आकाश खंडेराव, भगवान खराटे, रेणुका देशमुख, कर्मचारी सुलोचना गणोरकर, प्रसाद चव्हाण, विशाल तराळे, अशोक मथुरे, राम गवई, उज्ज्वल निकम यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.