चोखंदळ वाचकांनी बुके ऐवजी दिले बुक....'जयश्रीताई' यांना शिवाजी कोण होता ? या असंख्य पुस्तकांची भेट !

चोखंदळ वाचकांनी बुके ऐवजी दिले बुक....
'जयश्रीताई' यांना शिवाजी कोण होता ? या असंख्य पुस्तकांची भेट !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         शिवाजी कोण होता या पुस्तकावरून राज्यात वाद असला तरी बुलढाण्यातील सुज्ञ वाचकांनी मात्र एडवोकेट जयश्रीताई शेळके यांना या पुस्तकाच्या आज शेकडो प्रती भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.जयश्रीताई म्हणजे पुस्तकांचे वाचन, ताई म्हणजे चिंतन, मनन आणि मग समाजकारण हे समीकरण जणू रूढ आहे ते पुन्हा एकदा दिसून आले. साधारणतः राजकीय व्यक्तींचा वाढदिवस म्हटला की वेगवेगळे उत्सवी कार्यक्रम ठरलेलेच.. परंतु कमालीचा साधेपणा लाभलेल्या जयश्रीताईंच्या वाढदिवसाला पुस्तकांचाच माहोल दिसला.या वेळी महाराणा या पुस्तकाचे प्रकाशनही शेळके दाम्पत्याच्या हस्ते पार पडले.

         बुलढाणाची भूमी ही राजकारणातही वैचारिकदृष्ट्या संपन्न आहे. माजी खासदार पंढरीनाथ पाटलांनी तर शेकड्याने पुस्तकांचे वाचन केले होते. त्यांनी राज्यभर फिरून महात्मा फुलेंचे अस्सल चरित्र देखील लिहिले. आज शासन दरबारी हेच चरित्र अस्सल चरित्र मानले जाते. खासदार असणारा माणूस दर्जेदार संशोधक, लेखकही होता.बुलढाण्याचे आमदार राहिलेले बाबुरावजी पाटील यांचे वाचन वेड तर सर्वपरिचित आहे. कुठल्याही विषयाचा अत्यंत सखोल अभ्यास आणि तिची लोकभाषेतील मांडणी हे बाबुराव काकांचे पुन्हा एक वैशिष्ट्य. त्याच मुशीत तयार झालेल्या जयश्रीताई यांची नाळ देखील वाचनाशी जुळली आहे. ढीगभर पुस्तकांचे वाचन करून त्यांनी राज्यामध्ये "वैचारिक"ओळख निर्माण केली आहे. या बौद्धिक क्षमतेवर त्यांना ठाकरे शिवसेनेने राज्य प्रवक्ते हे मान सन्मानाचे पद देखील मिळाले. आज जयश्रीताई शेळके यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यालयामध्ये भपकेबाजीला फाटा देत अत्यंत साधेपने साजरा करण्यात आला. नाही म्हणायला चहापाण्याची व्यवस्था होती. मात्र सकाळपासून चाहत्यांची रीघ दिसून आली. येणारे फुलांच्या बुके ऐवजी पुस्तके भेट देत होते.त्यातही कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता ? या पुस्तकाच्या असंख्य प्रति जयश्री ताईच्या कार्यालयामध्ये दिसून आल्या. राजकीय व्यक्तींचं कार्यालय आणि पुस्तकांचा खचाखच असे अनोखे चित्र ताईच्या वाढदिवसानिमित्त दिसले. ज्या व्यक्तीमत्वाची ची नाळ शब्दांशी, अभ्यासाशी जोडली असेल, जिथे "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने"... असे शब्द धन मानले जात असेल त्या व्यक्तिमत्त्वास बुलढाणेकरांनी वैचारिक भेट देऊन सुखद धक्का दिला.
          यावेळी झालेल्या कार्यक्रमात महाराणा या जगदीश चंद्र पाटील लिखित पुस्तकाचे प्रकाशनही जयश्रीताई शेळके व अभिता कंपनीच सीईओ सुनील शेळके यांच्या हस्ते पार पडले.