जळगाव खानदेशची प्रसिद्ध लिंबू शिकंजी बुलढाणा शहरात दाखल* शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर

जळगाव खानदेशची प्रसिद्ध लिंबू शिकंजी बुलढाणा शहरात दाखल
* शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         दरवर्षी पेक्षा यावर्षी उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. सध्या महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात 40 ते 45 च्या दरम्यान तापमान वाढलेले आहे. याला अपवाद असलेला बुलढाणा जिल्हा सुद्धा यावर्षी यामधून सुटलेला नाही,  थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे बुलढाणा शहर हे यावर्षी खूप तपत आहे. जीवाची लाही-लाही करणाऱ्या या उष्णतेमुळे जनता हैराण होऊन जीवाला थंडावा मिळावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल युक्त थंड पेय पिऊन जिवाला समाधान मिळविण्याचे प्रयत्न करत आहे,  मात्र हे थंड पेय आपल्या शरीराला घातक सुद्धा असतात . त्यामुळे जळगाव खान्देश परिसरात या थंड पेयला पर्याय म्हणून गेल्या दहा-पंधरा वर्षापासून आयुर्वेदिक लिंबू शिकंजी हे खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आहे. त्या परिसरातील जनता ही लिंबू शिकंजी वर जोर देऊन आपल्या शरीरातील उष्णता कशी कमी करता येईल याचे पुरेपूर प्रयत्न करीत आहे. 
आता ही जळगाव खान्देश येथील प्रसिद्ध असलेली लिंबू शिकंजी बुलढाणा शहरात दाखल झाली आहे. यामध्ये चिया सीड, निंबू, काही प्रमाणात खडी साखर, आणि काळे मीठ ज्याला आपण सेंद्र्या मीठ म्हणतो, या सर्वांना पासून ही लिंबू शिकंजी तयार केलेली असते . पिण्यासाठी खूप टेस्टी आणि शरीराला फायदेशीर असलेली लिंबू शिकंजी फक्त 15 रुपये ग्लास असल्याने बुलढाणा शहरातील जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.