बुद्ध जयंतीच्या पर्वावर थार येथे बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

बुद्ध जयंतीच्या पर्वावर थार येथे  बुद्ध-भीम गीतांचा प्रबोधनात्मक  कार्यक्रमाचे आयोजन 
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
          तथागत भगवान गौतम बुद्ध जन्मोत्सव मंगलमय दिनाच्या पर्वावर गृहप्रवेशाच्या निमित्ताने थार येथे महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका वैशाली शेंडे, परिवर्तनाचा बुलंद आवाज गायक प्रबोधनकार देवाभाऊ वानखेडे यांचा बुद्ध - भीम गीतांचा परिवर्तनवादी प्रबोधनात्मक संगीतमय कार्यक्रम 8 मे रोजी शुक्रवार ला आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचे उद्घाटक मोहन मगर (ग्रामपंचायत आधिकारी,) सिद्धार्थ वानखेडे ( सरपंच,) सौ.नंदाबाई राजेश होणे (उपसरपंच),  कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.विलास शेजुळ आरक्षण बचाव कृती समिती (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य), रविंद्र वाघ मुख्य संपादक दैनिक अखंड झेप, कार्यक्रमाचे प्रसिद्धीप्रमुख सुनील मोरे पत्रकार ( दैनिक मातृभूमी), गजानन सरकटे पत्रकार (दैनिक सेवा शक्ती टाईम्स ) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वानखेडे, विशेष अतीथी अँड राजेश दाभाडे (दिवानी फौजदारी कोर्ट मेहकर), कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते समाधान मिसाळ, सौ.वर्षा समाधान मिसाळ यांनी केले असून कार्यक्रमासाठी सहकार्य यशोधरा महिला मंडळ, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, नवयुवक मित्र मंडळ यांनी केले आहे. या कार्यक्रमाला पंचक्रोशातील बहुजन बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते समाधान मिसाळ यांनी केले आहे.