* मागे हटले नाही ; शिवाजी कोण होता? पुस्तकाचे केले वाचन...
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
युवक काँग्रेसने आज २९ एप्रिल रोजी येथील संगम चौकात संविधानिक मार्गाने आंदोलन केले. शिवाजी कोण होता? पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. 'छत्रपती का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान', तुमचे आमचे नाते काय? जय भवानी जय शिवराय अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवस्मारक परिसर दणाणून गेला होता.
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून पुरोगामी संघटना आणि आ. गायकवाड यांच्यात संघर्ष उफाळत चालला आहे. काल बुलढाण्यात भारतीय कम्युनिस्ट आणि इतर डाव्या संघटनांकडून झालेले गायकवाड यांच्याविरुद्धचे आंदोलन चिरडल्या गेल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर आज युवक काँग्रेसचे जोरदार आंदोलन केले. युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मागे हटले नाही. प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन हे झाले. यावेळी काँग्रेस नेते संदीपदादा शेळके, शहराध्यक्ष दत्ता काकस, विश्वजित पडोळ, शिवराज पाटील, रिजवान सौदागर यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते हजर होते. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमदार गायकवाड समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. दोघांकडूनही प्रचंड घोषणाबाजी झाली, परंतु पोलिसांच्या मध्यस्थीतीने संघर्ष टळला. याप्रसंगी मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
