मन्सूर शहा पत्रकार क्षेत्रातील राज्यस्तरीय पुस्काराने सन्मानित
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया व महाराष्ट्र ग्रामीण न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड 2026‘ या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र एक्सलन्स अवार्डने मन्सूर शहा सरदार शहा धोत्रा भणगोजी तालुका चिखली यांना पत्रकार क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्काराने 6 मे रोजी मलकापूर येथील डॉ.हेडगेवार सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र ग्रामीण न्यूज च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश या उपक्रमाचा आहे. पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मन्सूर शहा सरदार शहा यांची निवड करण्यात आली . त्यांनी शहरी व ग्रामीण भागातील बातम्या प्रसिद्धी करून सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य यामुळे त्यांना हा सन्मान बहाल करण्यात आला. हा पुरस्कार वितरण समारंभ प.पू. डॉ. हेडगेवार सभागृह, चांडक विद्यालय, मलकापूर (जि. बुलढाणा) येथे सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
