केंद्र सरकारने महागाई कमी करण्या सोबत इतर भुल थापा देवून केंद्रात आपली सत्ता काबीज केली. माञ सत्तेवर आल्यानंतर महागाई कमी करण्याऐवजी पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तुच्या दरवाढ भाव गगनाला भिडवले आहेत, याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने इंधन दरवाढ विरोधात चॉकलेट वाटप करुन आज 20 ऑक्टोंब रोजी येथील हिरोळे पेट्रोल पंपावर गांधीगिरी आंदोलन केले.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष मनिष बोरकर यांच्या नेतृत्वात येथील जयंस्तंभ चौक स्थित हिरोळे पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, केंद्रात युपीए सरकार असतांना पट्रोल 40 ते 50 रुपये लिटर, डिझेल 30 ते 40 रुपये लिटर आणि गॅस 300 ते 400 रुपयेचे भाव होते. परंतु भाजपाने युपीए सरकारच्या विरोधात खोटे दावे करुन जनतेची दिशाभूल केली व सत्तेत आले. त्यानंतर एनडीए सरकारने सर्व जीवनावश्यक वस्तुंचे भाव दुप्पट व तिप्पट केले. केंद्र सरकार हे सर्व सामान्य नागरीकांच्या खिशाला झळ कशी बसेल यासाठी जीवनावश्यक वस्तुच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ करत आहे.
ज्या केंद्र सरकारने 100 रुपयांत उज्वला योजनेअंतर्गत गॅसचे वाटप केले त्याच गॅसचा दर आज 1000 रुपये इतका केला आहे. कोरोना सारख्या महामारीतून व अतिपावसाच्या अडचनीतुन सर्व सामान्यांचे जीवन जगने कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तुच्या किंमतीमध्ये वाढलेल्या दराच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने जयस्तंभ चौक स्थित हिरोळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहन धारकांना गुलाब पुष्प व चॉकलेट वाटप करुन गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेवुन जीवनावश्यक वस्तुंच्या वाढलेल्या दरामध्ये कपात करुन सर्वसामान्यांना न्याय दयावा, अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने संपुर्ण महाराष्ट्रात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष मनिष बोरकर, संदिप तायडे, बळीराम सुसर, गणेश कोरके, मंगेश बिडवे, अनिल बावस्कर, मनोज चंदन, गौरव देशमुख, अमोल सोनुने, विशाल फदाट, कैलास जाधव, वैभव हिंगे, सुधाकर धुरंधर, साहील शेख, किशोर वानखेडे, गणेश शिंदे, सागर काळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
