बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित श्री. शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय शेलसूर तालुका चिखली येथून अध्यापनाचे कार्य करीत असताना प्रा.सुनील सपकाळ यांचे शिक्षण क्षेत्रात प्रतिभावान विद्यार्थी घडविण्यात मोलाचे कार्य आहे. या कार्याची दखल घेत त्यांना जिल्हा परिषद शिक्षण विषय समितीवर शिक्षण सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या नियुक्तीचे पत्र नुकतेच त्यांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. कमलताई जालींधर बुधवत यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे त्यांचे सर्वस्तरावरून अभिनंदन होत आहे.
