* आमदार प्रणिती शिंदे यांचे आश्वासन
* पत्रकार संरक्षण समिती अध्यक्ष पुरूषोत्तम बोर्डे यांनी दिले निवेदन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
बुलडाणा ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिका मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन अनुसूचित जाती समितीच्या प्रमुुख आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले. पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच आ. प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पत्रकारिता हि लोकशाही मधील चौथा स्तंभ असून समाजातील चांगल्या- वाईट घटना दररोज समाजाला देण्याचे काम करतो ,या सर्व कामात ग्रामीण पत्रकाराची महत्वाची भूमिका असते, पत्रकारितेचा पाया ग्रामीण भागावर आहे ,मात्र राज्य सरकार कडून ग्रामीण पत्रकार हा घटक दुर्लक्षित आहे ,म्हणून शहरी किंवा अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सोई सवलती दिल्या जाताात. त्याच सुविधा ग्रामीण पत्रकारांना सुद्धा देण्यात याव्या, सरकारने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला त्याची त्वरित अंमलबजावणी करावी आणि हा कायदा ग्रामीण पत्रकारांना लागू करावा ,ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती देण्यात यावी ,अधिस्वीकृती मिळण्याकरिता त्यातील अटी शिथिल कराव्या, राज्य सरकारच्या शासकीय समितीवर अशासकीय सदस्य निवडतांना पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करावी, अधिस्वीकृती धारक पत्रकारांना मिळणाऱ्या सोयी बस प्रवास, रेल्वे प्रवास, टोल नाका सवलत, आरोग्य सेवा आदी सेवा त्वरित लागू कराव्या , ग्रामीण पत्रकारांना घरकुल योजना मिळण्यासाठी ग्रामपंचायती मध्ये पत्रकारांना राखीव घरे करावी, ग्रामीण पत्रकारांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे ,खाजगी अथवा शासकीय कॉन्व्हेट मध्ये पत्रकारांच्या मुलांसाठी राखीव जागा ठेवाव्या आदी मागण्या निवेदनात नमूद आहेत. निवेदन देतेवेळी जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जाधव, जेष्ठ पत्रकार प्रा. सुभाष लहानेे, निलेश जोशी, जिल्हा उपाध्यक्ष रामदास कहाळे, प्रेमकुमार राठोड, लक्ष्मीकांत बगाडे, संदीप वानखेडे, निलेश राऊत, समाधान चिंचोले, रमेश खंडारे, शौकत शाह, इसरार देशमुख आदी उपस्थित होते.
