* सामाजिक बदलाच्या स्तुत्य उपक्रमात सहभागी व्हावे - महेश रिंढे
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
विधवा व एकल महिलांचा सामूहिक विवाह सोहळा 17 मे रोजी मेहकर येथे ठेवण्यात आला आहे. सामाजिक बदलाच्या स्तुत्य उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी वैभव चे महेश रिंढे यांनी केले आहे. तर असे उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणतात असे शैलेश सावजी यांनी म्हटले आहे.
मेहकर येथे कृषी वैभव लॉन्स या ठिकाणी विधवा विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
मानस फाउंडेशन बुलढाणा, सपना सावजी ट्रस्ट ,कृषी वैभव लॉन्स, युगांतर मल्टी कॉपरेटिव बँक, उत्कर्ष अर्बन पतसंस्था मेहकर च्या पुढाकारात हा विवाह सोहळा पार पडत आहे. विधवा घटस्फोटीत एकल महिलांचे जीवन प्रकाशमान व्हावे, यासाठी एकल महिला सन्मान चळवळ प्रा. डी.एस. लहाने यांच्या संकल्पनेतून राबवली जात आहे. जिल्ह्यात यापूर्वी देखील पुनर्विवाह सोहळे आयोजित करण्यात आले आहे. तर 17 मे रोजी मेहकर येथे 10 ते 1 दरम्यान सामूहिक विवाह सोहळा आहे. या कार्यक्रमासाठी शामभाऊ उमाळकर, महेश रिंडे, शैलेश सावजी, ऋषिक चव्हाण व इतर सामाजिक व्यक्तींच्या सहभागाने जयत नियोजन केल्या जात आहे. उत्कर्ष अर्बन पतसंस्था डोणगाव तसेच युगंधर मल्टी कॉपरेटिव बँक अध्यक्ष चव्हाण आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला आहे.
* असा आहे आहे उद्देश :
विधवा महिलांचा विवाह करण्याकडे सामाजिक कल दिसून येत नाही. उलट त्यांना कमी लेखले जाते. अशावेळी विधवांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देत त्यांचे आपत्यासह स्वीकारण्याची तयारी ठेवण्याची मानसिकता तयार करण्याचे काम मानस फाउंडेशन बुलढाणा द्वारा सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणी एकल महिलांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. विधवा महिलांनी आपल्या समस्यासाठी पुढे यावे, त्यांना खुलेपणाने बोलण्याचे व्यासपीठ मिळाले पाहिजे व सामाजिक बदलासाठी समाजाची मानसिक तयारी या उद्देशाने सदर विवाह सोहळा होत आहे.
* सामाजिक व्यक्तींच्या मदतीची गरज :
सामूहिक विवाह सोहळा म्हटला की नवरदेव, नवरी आणि वऱ्हाडाची व्यवस्था सुद्धा करावी लागते. संसार बाटली, कपडे जबाबदारी देखील पार पाडाव्या लागतात. यासाठी सामाजिक सहभागाची गरज असून मदतीच आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने यांनी केले.
