ॲक्शन मोडवर : अवैध लाकडावर सलग दुसरी कारवाई
* केळवदच्या विश्वकर्मा सॉमिलवर धाड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
चिखली तालुक्यातील केळवद येथील विश्वकर्मा सॉमिलवर १२ मे रोजी जिल्हा उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी धाड टाकली . सदर कारवाईत सुमारे दहा लाख रुपयांचे अवैध सागवान, खैर, कडूलिंब व कट साइज लाकडे जप्त करण्यात आली. तसेच सॉमिल सील करण्यात आली.
जिल्ह्यामधील सॉमिलवर लाकडांची अवैध कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी वेळ न घालविता चिखली तालुक्यातील केळवद येथील विश्वकर्मा सॉमिलवर देखील सागवनाची अवैध कटाई होत असल्याचे समजताच जमीर शेख यांनी पथकासह धाड टाकली. यावेळी सागवानाचे एकूण ३.५६५ घनमीटर ६७ नग (किंमत २ लाख ५१ हजार ५७८) सागवान, साग चौरस नग १०१ (किंमत ५ लाख) व आडजात लाकडे (किंमत २ लाख ५० हजार) असा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या लाकडांबाबत सॉमिलचालकाकडे कोणताही परवाना नव्हता. ही लाकडे जप्त करून लाकूड आगारात जमा करण्यात आली.
याप्रकरणी विश्वकर्मा सॉमिल मालक संजय शर्मा याच्यावर वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएफओ जमीर शेख यांच्या नेतृत्वात वनपाल प्रदीप प्रकाश मुंढे, वनरक्षक समाधान झोटे, गजानन शिंदे, नितेश गवई, सरोदा कराड, विक्रम राऊत, चालक संदीप मडावी, वनमजूर दीपक सोनवणे, रवींद्र तायडे, अमोल चव्हाण, पवन वाघ, आकाश शिरसाट, अंकुश गायकवाड, पवन गायकवाड यांनी ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास बुलढाणा वनपरिक्षेत्राचे अधिकारी प्रादेशिक सुनील वाकोडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
