पेपर फुटी राज्य अन केंद्र सरकारची ओळख- जयश्रीताई शेळके

पेपर फुटी राज्य अन केंद्र सरकारची ओळख- जयश्रीताई शेळके
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        पेपर फुटी ही राज्य आणि केंद्र सरकारची ओळख बनली आहे, अशी टीका शिवसेना उबाठा राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी केली आहे.

        वर्षभर करिअरचे स्वप्नं रंगवत दिवसरात्र विद्यार्थी अभ्यास करतात. मात्र, नीट २०२६ ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाली. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या मेहेरबानीमुळे २०२४ च्या नीट घोटाळ्यात सामील असलेले प्रदीपकुमार जोशी हे आजही एनटीएचे प्रमुख आहेत, असे जयश्रीताई शेळके यांनी आज 12 मे रोजी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले.