वाहतुकीसाठी अयोग्य ठरणा-या रस्त्यांची तत्काळ दुरूस्ती करा* राष्ट्रवादीचे मनोज दांडगे यांची मागणी* बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन

वाहतुकीसाठी अयोग्य ठरणा-या रस्त्यांची तत्काळ दुरूस्ती करा
* राष्ट्रवादीचे मनोज दांडगे यांची मागणी
* बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना दिले       निवेदन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    बुलडाणा तहसील स्थित मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधील सातगाव फाटा ते कुलमखेड व कुंबेफळ फाटा ते टाकळी या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था दूर करून रस्त्याची दुरुस्ती व नवीन बांधणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज दांडगे यांनी एका निवेदनाव्दारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली असून, सदरचे काम न झाल्यास जन आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.
     यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष निलेश देठे, सतीश शिंदे,नारायण आमले, शंकर देठे उपस्थित होते. मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधील सातगाव फाटा ते कुलमखेड व कुंबेफळ फाटा ते टाकळी हे दोन्ही रस्ते मराठवाड्याशी जोडले जातात. या दोन्ही रस्त्यांनी खूप जास्त प्रमाणात दळणवळण चालते.या दोन्ही रस्त्याने चालणे व वाहन चालविणे सुद्धा खूपच अवघड झालेले आहे . रस्त्यांनी मोठमोठी खड्डे पडलेली आहे. त्यामळे अपघाताचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे. उपरोक्त रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी म्हणून या अगोदरही याच रस्त्या संदर्भात दोन वेळा निवेदन देवून सुद्धा कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. रस्त्याबाबत दुरुस्ती न झाल्यास २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजेपासून सातगाव फाटा येथे सातगाव, कुलमखेड , कुंबेफळ, टाकळी येथील जनतेच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल असा ईशारा ही निवेदनात दिला आहे.