लाभार्थ्यांना आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते अनुदान निधी वाटप * पाच लाभार्थ्यांना एक लाखाची मदत प्रदान

लाभार्थ्यांना आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते अनुदान निधी वाटप  
* पाच लाभार्थ्यांना  एक लाखाची मदत प्रदान

बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 20 हजार रुपये निधी वितरित करण्यात आला. हा निधी आज 25 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री संपर्क कार्यालय येथे वितरित करण्यात आला.          राज्य शासनाच्या वतीने दारिद्र रेषेखालील कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा अपघाती मृत्यू अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या परिवारातील अज्ञान मुलांना, अविवाहित मुलींना आणि मृत व्यक्ती वर अवलंबून असलेल्या आई-वडिलांना तसेच अविवाहित प्रौढांचे अज्ञान भाऊ-बहीण यांना लाभ मिळतो. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थी मंजूर करण्याचे अधिकार संबंधित तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहे. सदर योजनेचा अर्ज मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्यास एक वर्षाच्या आत तहसील कार्यालयात सादर केलेला असावा लाभ घेणारे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील असावे व मयत व्यक्तीचे नावे कुटुंब प्रमुख म्हणून  गट विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असून संबंधित परिवाराची वार्षिक उत्पन्न पंधरा हजाराच्या आत असावे लागते. या निकषाच्या अनुषंगाने आज पाच महिलांना सदर योजनेचा निधी वितरित करण्यात आला. यात तांदूळवाडी येथील सुमंत सतीश पंडित, हथेडी येथील मंगला फकिरा वाघ, खेर्डी येथील कौशल्य कुमठे तर दुधा येथील वनिता गजानन सोनवणे किरण समाधान नरोटे या पात्र महिलाचा समावेश आहे.
             सदरचा निधी वितरित करताना नायब तहसीलदार पवार संजय पाटील, निलेश पाटील, विजय जायभाये, श्रीकृष्ण शिंदे आदी उपस्थित होते.