दिवाळीपर्यंत शेतक-यांना मदत दया अन्यथा काळी दिवाळी साजरी करू - आ.श्वेता महालेंचा आघाडी सरकारला सज्जड इशारा

दिवाळीपर्यंत शेतक-यांना मदत दया अन्यथा काळी दिवाळी साजरी करू - आ.श्वेता महालेंचा आघाडी सरकारला सज्जड इशारा
चिखली : (दगडू यादव)
   गेल्या तीन वर्षापासून विदर्भातील शेतकरी दुष्काळाचा सामना करीत आहेत. प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही कोणत्याही प्रकारची मदत या निष्क्रिय आघाडी सरकारकडून दिल्या गेली नाही. पश्चिम महाराष्ट्रात काही झाली तर अख्खे मंत्रिमंडळ तेथील जनतेला दिलासा देण्यासाठी जातात. त्यांच्यासाठी हजारो कोटींचे पॅकेज दिल्या जाते. परंतु विदर्भातील शेतकऱ्यांसाठी या सरकार जवळ एक दमडी सुद्धा नाही. यावर्षी परतीच्या पावसाने चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या. पंचनामे झाले परंतु माझ्या चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले. त्यामुळे दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत न मिळाल्यास आघाडी सरकारच्या विरोधात काळी दिवाळी साजरी करण्याचा खणखणीत इशारा आघाडी सरकारला दिला.
  
    शेतकरी व सर्वसामान्य माणसांच्या न्यायहक्कासाठी आ.सौ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात आघाडी सरकारच्या विरोधात हजारो शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा सोमवार 25 ऑक्टोबर रोजी स्थानिक तहसील कार्यालयवार काढण्यात आला होता. या मोर्चात मार्गदशर्र्न करताना त्या बोलत होत्या. चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आसूड मोर्च्याला सुरुवात झाली. जयस्तंभ चौक, महात्मा बसवेश्वर चौक, बैलजोडी समोरून आसूड मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात सभापती सौ. सिंधुताई तायडे, उपसभापती सौ. शमशाद पटेल, पं.स. सदस्या सौ. मनीषाताई सपकाळ, जि.प. सदस्या सौ. सुनंदाताई शिनगारे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. द्वारकाताई भोसले, शहराध्यक्ष सौ. सुनिताताई भालेराव, महिला किसान आघाडी तालुकाध्यक्ष सौ. नीताताई सोळंकी, जेष्ठ नेते रामदास देव्हडे, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, सुरेंद्र पांडे, रामकृष्णदादा शेटे, तालुकाध्यक्ष डाँ. कृष्णकुमार सपकाळ, बुलडाणा तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, संदीप उगले, मोहन पवार, वीरेंद्र वानखेडे, सुधाकर काळे, संजय महाले, अनमोल ढोरे, पंजाबराव धनवे, शिवराज पाटील, संतोष काळे पाटील, योगेश राजपूत, अर्जुन दांडगे, सागर पुरोहित, गोविंद देवडे, विजय नकवाल, वजीराबी शे. अनिस, ममताताई बाहेती, अनुप महाजन, मंगलाताई झगडे, अर्चना खबुतरे, नामू गुरुदासानी आदी सहभागी झाले होते.