वीस गावातील शिक्षकांची घेतली ध्यास गुणवत्तेचा कार्यशाळा* जि.प.उपाध्यक्षा सौ.कमलताई बुधवत यांचा पुढाकार

वीस गावातील शिक्षकांची घेतली ध्यास गुणवत्तेचा कार्यशाळा
*  जि.प.उपाध्यक्षा सौ.कमलताई बुधवत यांचा पुढाकार
 बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढावी तसेच जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळांना ISO नामांकन मिळावे या दृष्टिकोनातून मासरूळ जि. प. सर्कलमधील वीस गावाच्या शाळेतील शिक्षकांची ध्यास शैक्षणिक गुणवत्तेचा कार्यशाळा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. कमलताई जालिंधर बुधवत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कृउबा समितीचे मुख्य प्रशासक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, पं. स. उपसभापती श्रीकांत पवार, पं. स. सदस्य दिलीप सिनकर, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, गट शिक्षणाधिकारी संजय पवार , विस्तार अधिकारी वंदना टाकळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार 23 ऑक्टोबर रोजी स्थानिक ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र येथे संपन्न झाली.
       कार्यशाळेला उपस्थित शिक्षक बंधु आणि भगिनींना चित्रफितीद्वारे प्रेरक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ISO मानांकन प्राप्त शाळांच्या प्रतिनिधींनी सखोल मार्गदर्शन केले. मासरूळ जि. प. सर्कलमधील गावात जि. प. उपाध्यक्षा यांच्या माध्यमातून जि. प. शाळांना शैक्षणिक साहित्य, विज्ञान साहित्य, आर.ओ.  पिण्याचे  पाणी, सोलर पॅनल, स्वछतागृह, तसेच शाळांना आवश्यक असणाऱ्या सुविधा बऱ्याच शाळांना देण्यात आल्या असून इतर शाळांनाही या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी जालिंधर बुधवत यांनी सांगितले. ISO मानांकन प्राप्त शाळांच्या मुख्यध्यापकांनी जालिंधर बुधवत यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा पुरविल्याबद्दल आभार मानले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, शाळा समिती अध्यक्ष, तसेच शिक्षक बंधु आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.