महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर* आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर
* आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      आमदार संजय गायकवाड यांनी मतदारसंघा सोबतच मतदार संघातील बुलडाणा आणि मोताळा या नगरपालिका, नगरपंचायत  क्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प केला असून बुलडाणा शहरातील भरीव कामासोबतच मोताळा नगरपंचायत साठी सुद्धा 25 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मंजूर केलेला आहे.
     या भरघोस निधीमुळे  शहरांचा चेहरामोहरा बदलणार असून शहराच्या विकास कामांमध्ये याचा फार मोठा हातभार लागणार आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत मंजूर झालेल्या निधी मध्ये शहरांमधील विविध विकास काम पूर्णत्वास जाणार आहे. यामध्ये शहरातील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, डांबरीकरण, सीडी वर्क्स, नाली बांधकाम, शहरांमधील ओपन स्पेस चा विकास इत्यादी अनेक विकासकामे होणार आहेत.
    मोताळा  तालुक्याच्या इतिहासामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या  स्वरूपाचा निधी आमदार संजय गायकवाड  यांनी मंजूर करून आणला आहे. यापूर्वी आमदार संजय गायकवाड यांच्या निधीमधून दोन कोटी रुपयांची कामे शहरांमध्ये पूर्णत्वास गेली आहे. मोताळा शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून बुलडाणा शहराच्या धर्तीवरच मोताळा शहराचा सुद्धा विकास केला जाईल , असे आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी अनेक आमदार मतदार संघामध्ये झाले, परंतु इतक्‍या मोठ्या स्वरूपात कोणीही निधी दिला नव्हता.