वाचन प्रेरणादिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनी

वाचन प्रेरणादिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी म्हजेच १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिवस साजरा केला आहे. या दिनाच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
      १४ ऑक्टोबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन केले जाणार आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता, समिक्षण, ऐतिहासीक, पौराणिक अशा विविध वाचन साहित्यासह विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे पुस्तके या ग्रंथप्रदर्शनीत उपलब्ध राहणार आहेत. वाचक व ग्रंथ्रेमींसाठी १८ ऑक्टोंबरपर्यंत ही ग्रंथप्रदर्शनी सुरु राहणार आहे. जास्तीत जास्त वाचक व ग्रंथप्रेमींनी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोरोना नियमांचे पालन करुन या ग्रंथ प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांनी केले आहे.