स्व. सोमनाथ सावळे यांचे पत्रकारितेतील योगदान मोलाचे ठरले ः राजेंद्र काळे* प्रथम स्मृतीदिनानिमित्त पत्रकारांच्या वतीने अभिवादन


स्व. सोमनाथ सावळे यांचे पत्रकारितेतील योगदान मोलाचे ठरले ः राजेंद्र काळे
* प्रथम स्मृतीदिनानिमित्त पत्रकारांच्या वतीने अभिवादन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     प्रशासन, शासनातील गाढा अभ्यास शिवाय विविध क्षेत्रातील माहिती, साहित्य व संपादकीय लेखणीच्या माध्यमातून विदर्भासह संपुर्ण राज्यात बुलडाणा जिल्ह्याची व स्वतःची ओळख निर्माण करणारे पत्रतपस्वी, बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्काराने सन्मानित स्व. सोमनाथ सावळे यांचे पत्रकारितेतील मोलाचे योगदान ठरले आहे. पत्रकारितेतील इतिहासात पहिल्यांदा त्यांची हुबेहुब मुर्ती असलेले मंदिर डोंगरशेवली या गावी त्यांच्या शेतात त्यांची पत्नी सुरेखा व मुलगी मृणाल, श्रृती यांच्या पुढाकाराने बांधण्यात आले आहे. नव्या पिढीतील पत्रकारासाठी ते कायम मार्गदर्शकाच्या भूमिकेत होते. त्यांच्या अकाली निधनाने संपुर्ण पत्रकारिता क्षेत्राला फार मोठा धक्का बसला. असे भावोद्गार मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी व्यक्त केले.
    बुलडाणा येथील पत्रकार भवन येथे  14 ऑक्टोबर रोजी जेष्ठ पत्रकार स्व. सोमनाथ सावळे यांचा प्रथम स्मृतीदिन अभिवादन कार्यक्रम दुपारी पार पडला. याप्रसंगी व्यासपीठावर पत्रकार राजेंद्र काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन, स्व. सोमनाथ सावळे यांच्या पत्नी साप्ताहिक शिवराणाच्या संपादिका सुरेखा सावळे, मुलगी मृणाल उपस्थित होत्या. प्रारंभी स्व. सोमनाथ सावळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहरातील विविध वृत्तपत्राचे तसेच प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधीनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण केले. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस नितीन शिरसाट, कार्याध्यक्ष चंद्रकांत बर्दे, प्रेस कॉन्सीलचे अध्यक्ष सुधाकर अहेर, संपादक रणजितसिंह राजपूत, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष प्रा. सुभाष लहाने, दुरदर्शनचे प्रतिनिधी युवराज वाघ, संदीप चव्हाण, वृत्तवाहिनीचे वसिम शेख, जनमाध्यमाचे प्रेमकुमार राठोड यांनी स्व. सोमनाथ सावळे यांच्या जीवनावर तसेच त्यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाच्या आठवणींना उजाळा दिला.

माझ्या परिवाराशी कौटुंबिक संबंध ः अरूण जैन
       पत्रकारितेला प्रारंभ केल्यानंतर जुन्या काळात मोजक्या पत्रकारामध्ये आपल्या रुबाबदार शैलीने शासन, प्रशासनासोबत इतर क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना आपल्या अभ्यासपुर्ण ज्ञानाच्या जोरावर स्तब्ध करणारे असे मनमिळावू स्वभावाचे स्व. सोमनाथ सावळे यांनी जिल्ह्यातील कोणत्याही वृत्तपत्राच्या प्रतिनिधीवर अन्याय झाल्यास सर्वात पुढे होऊन न्याय मिळवून दिला. पत्रकार हल्ला विरोधी कायदा तयार करण्यासाठी शेवटपर्यत संघटनेच्या माध्यामातून संघर्ष केला. जिल्हा पत्रकार संघातील ग्रंथालयास स्व. सोमनाथ सावळे यांचे नाव देण्याची संकल्पना असून त्यांचे व माझे कौटुंंबिक संबंध असल्याचे तसेच माझ्या भावाने त्यांच्या सोबत वृत्तपत्रात सहकारी म्हणून बरेच वर्ष काम केल्याच्या आठवणींना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन यांनी उजाळा दिला.

वडीलांचा आर्दश डोळयासमोर ठेवून मार्गक्रमण करणार ः मृणाल सावळे
     माझ्या वडीलांचे पत्रकारितेच्या क्षेत्रात संपुर्ण आयुष्यभर योगदान होते. त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान, भाषा प्रभुत्व, अमोघवाणी आणि तत्वानुसार विचाराशी तडजोड न करण्याची क्षमतेचा प्रभाव माझ्यावर बालपणापासून संस्काररूपाने झाला आहे. त्यामुळे यापुढील काळात त्यांनी सुरू केलेले साप्ताहिक शिवराणाच्या माध्यमातून आपण कार्यरत राहणार असून त्यांनी डोंगरशेवली येथे शिक्षण घेतले. त्या शाळेतील विद्यार्थ्याना दरवर्षी पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा स्व. सोमनाथ सावळे यांची मुलगी मृणाल सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन दै. हिंदुस्थानचे गजानन धांडे यांनी केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष भानुदास लकडे, पत्रकार सिद्धार्थ आराख,  लक्ष्मीकांत बगाडे, संजय जाधव, सुनिल तिजारे, संदीप शुक्ला, पुरुषोत्तम बोर्डे, बाबासाहेब जाधव, निलेश राऊत, नितीन कानडजे, संदीप वानखेडे, सुनिल मोरे, दिपक मोरे, पृथ्वीराज चव्हाण, संदीप वंत्रोले, शौकत शाह , पवन चवरे यासह शहरातील विविध वृत्तपत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.