गौरव स्त्रीशक्तीचा पुरस्कार 2021 सोहळा संपन्न* बुलडाणा फिल्म सोसायटी व आयबेक्स क्रिएशन आयोजित

गौरव स्त्रीशक्तीचा पुरस्कार 2021 सोहळा संपन्न
* बुलडाणा फिल्म सोसायटी व आयबेक्स क्रिएशन आयोजित 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     सन्मान स्त्रीत्वाचा - गौरव स्री शक्तीचा पुरस्कार 2021 सोहळा 13 आक्टोबर 21 ला बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब बुलडाणा येथे सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला बुलडाणा अर्बन चे कार्यकारी संचालक डॉ.सुकेश झंवर , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन , देशोन्नती चे उपसंपादक राजेंद्र काळे व बुलडाणा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष भास्कर वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाचा शुभारंभ पाहुण्यांचे हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आला . नंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . कार्यक्रमाचे संचालन प्रेम कुमार इंगळे व खिल्लारे मॅडम यांनी केले. कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांचे हस्ते डॉ.उषा सोनुने , डॉ.कल्पना काटकर , डॉ अनीता राठोड , सौ.स्नेहलता मानकर , सौ.मोनीका शर्मा , किरण राठोड , सौ.वैशाली वैराळकर , डॉ.प्रतिमा व्यवहारे , सौ.स्नेहल चौधरी कदम आदि विविध क्षेत्रात कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे . कार्यक्रम संपल्यावर  अंबुसकर यांच्या कराटे गृपने प्रात्यक्षिके करून दाखविले . शेवटी राजेंद्र काळे उपसंपादक देशोन्नती व अरूण जैन अध्यक्ष जिल्हा पत्रकार संघ यांचे शुभहस्ते कराटे , मार्शल आर्ट , कबड्डी खेळाडुंचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला . कार्यक्रमादरम्यान काही सत्कार मुर्तीचे मनोगत सादर करण्यात आले. आभार प्रदर्शन खिल्लारे मॅडम यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरज वाडेकर , मयुर कंकाळ , शिंगणे , दिलीप घेवंदे यांनी परिश्रम घेतले.