बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्हातील नागरिकांसाठी शिवसेनेच्या वतीने धर्मवीर आमदार संजय गायकवाड़ यांच्या पुढाकारातून
दोन शीतशवपेटी उपलब्ध करून देण्यात आल्या. याचे लोकार्पण शनिवारी दुपारी धर्मवीर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले.
मृत झालेल्या व्यक्तीचे शव जास्त दिवस टिकत नाही. मृतकाचे नातेवाईक दूर गावातून येईपर्यंत मृतकाच्या शरीराचा गंध सुटतो. ते शव खराब होते. नातलग येई पर्यंत शव खराब होऊ नये याकरिता त्यास पेटीत ठेवले जाते. बुलडाण्यात पेटी संख्या कमी असल्याने आमदार संजय गायकवाड यांनी पुढाकार घेऊन पेटी
उपलब्ध करून दिली आहे. या पेट्यांची आवश्यकता ज्यांना असेल त्यांनी मोताळा तालुक्यात ज्ञानेश्वर वाघ व बुलडाणा तालुक्यात मृत्युंजय ऊर्फ कुणाल संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन धर्मवीर आमदार संजय गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी धर्मवीर आखाड़ा अध्यक्ष मृत्युंजय संजय गायकवाड़, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, आरोग्य सभापती आशिष जाधव, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड़, बाळाभाऊ जेऊघाले, दीपक तुपकर, स्वियसहाय्यक श्रीकृष्णा शिंदे, अनूप श्रीवास्तव, संतोष शिंगणे, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे, प्रवीण वाघलव्हाळे, मदन हिवाळे, निलेश डांगे, तसेच शिवसैनिक तथा युवासैनिक उपस्थित होते.
