* डॉ.सुभाष चव्हाण यांचा वैदयकीय परवाना निलंबित करा * पिडित रूग्णाचे सहकुटुंब उपोषण
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
चुकीच्या शस्त्रक्रिये ने रूग्णांवर अपंगत्व लादणारे अस्थिरोग तज्ञ डॉ. सुभाष चव्हाण यांचा वैदयकिय परवाना निलंबित करण्यात यावा, या मागणीसाठी रामेश्वर आव्हाड यांनी सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषणास सुरूवात केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, ७ जुलै रोजी उपोषणकर्ते रामेश्वर आव्हाड यांचा अपघात झाला होता.जखमी अवस्थेत त्यांना डॉ. चव्हाण यांच्या दवाखान्यात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. मनगटाचा भाग तुटलेला असल्यामुळे प्लेट टाकावी लागेल, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. परंतु त्यांनी शस्त्रक्रिया करताना प्लेट ऐवजी हातात दोन रॉड टाकले. त्यामुळे हाताला अपंगत्व आले आहे. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी तुमचा हात असाच कायमस्वरुपी राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे चुकीचा उपचार करून अपंगत्व लादणा-या डॉ. चव्हाण यांचा परवाना निलंबित करण्यात यावा अशी मागणी उपोषणकर्ते आव्हाड यांनी केली आहे.
