बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्हा रुग्णालय येथे जागतीक कन्या दिनाचे
औचित्य साधुन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.नितीन तडस यांचे हस्ते ११ ऑक्टोंबर रोजी जन्माला आलेल्या मुलींना ड्रेसचे वाटप करुन नवजात मुलींच्या पालकांना स्मृतीचिन्ह देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी मुलींच्या जन्माचे महत्व विषद करुन मातांना पोषण आहाराचे महत्व सांगीतले. तसेच डॉ. यास्मिन चौधरी यांनी परिवारामध्ये स्त्रिचे स्थान किती महत्वाचे आहे, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. यास्मिन चौधरी, श्रीमती अधिपरिसेविका आरती कुळकर्णी, परिसेविका श्रीमती राठोड,सा.आ.परिचारीका श्रीमती कुरसिंगे, श्रीमती संगीता वाघ, इंचार्ज सिस्टर श्रीमती डांगे, विधी समुपदेशक अॅड. वंदना काकडे (तायडे), पीसीपीएनडीटी सेलचे के.पी. भोंडे, विवेक जोशी तसेच रुग्णालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
