सरस्वती नगरातील पाच फुट लांब साप रेक्यू

सरस्वती नगरातील पाच फुट लांब साप रेक्यू 
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     स्थानिक सरस्वती नगरातील रहदारीच्या परिसरात पाच फुट लांब धामण जातीचा साप सर्पमित्रांच्या टिमने १२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेदरम्यान रेक्यू केला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
     सरस्वती नगरातील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरात असणारे शांतराम जवंजाळ यांच्या बिल्डींग परिसरात रस्त्यावर ५ फुट लांब धामण जातीचा साप रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटो चालकाला दिसून आला. यावेळी परिसरात लहान मुले मोठ्या प्रमाणात खेळत असल्यामुळे एकच खळबळ उडाली. यावेळी परिसरातील काही महिलांनी वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष, सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ आपल्या रेक्यु टिमला घटनास्थळी पाठविले. यावेळी रेक्यु टिममधील निखिल बेंडवाल या सर्पमित्राने जवंजाळ यांच्या बिल्डींग परिसरातील एका कोपऱ्यात पाण्याच्या टाकीच्या बाजूला लपलेल्या सापला पकडून बाटलीत जेरबंद केले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त केले. या घटनेमुळे मात्र परिसरात खळबळ उडाली होती.