बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय,बुलडाणा व प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळघाट येथे 14 ऑक्टोंबर रोजी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आज 11 ऑक्टोंबर रोजी देऊळघाट ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इम्रान खान यांच्या यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थितांना कोविड लसीकरणाचे महत्व समजावून सांगत लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच लसीकरण करण्याचे आवाहन केले. यशस्वी आयोजनासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. आ केंद्र हतेडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता रिंढे, डॉ. जवंजाळ व इतर सहकारी कार्य करीत आहे.
