नॅशनल ॲथलेटिक्स स्पर्धेत यश गायकवाड याला रौप्य पदक

नॅशनल ॲथलेटिक्स स्पर्धेत यश गायकवाड याला रौप्य पदक
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     स्वातंत्र्याचा अमृतमोहोत्सव व मा.गांधी जयंतीचे औचित्य साधून दिल्ली येथे झालेल्या नैशनल क्रीडा स्पर्धा 2021या स्पर्धेत ॲथलेटिक्स मध्ये यश गायकवाड याने रौप्य पदक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले.  
       यश दादाराव गायकवाड हा येथील शारदा ज्ञानपीठ या शाळेचा विद्यार्थी असून तो इयत्ता 9 वीत शिकत आहे.17 वर्षीय आतील गटात यश गायकवाड याने ॲथलेटिक्स 200 मीटर धावणे स्पर्धेत भाग घेऊन रौप्य पदक प्राप्त केले. 1व 2 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे झालेल्या या स्पर्धेत विविध राज्याच्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. यश दादाराव गायकवाड यांच्या माध्यमातून ॲथलेटिक्स मध्ये महाराष्ट्रला रौप्य पदक मिळाले. या यशाबद्दल यश गायकवाड याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो आपल्या यशाचे श्रेय क्रीडा अधिकारी अनिल इंगळे, प्रशिक्षक विजय वाकोडे, राजेश डिडोळकर व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देतो