जिल्हाधिकारी कार्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ

जिल्हाधिकारी कार्यालयात तंबाखू मुक्तीची शपथ
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी तंबाखू मुक्तीची शपथ दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, नायब तहसिलदार श्री. बनगाळे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.