अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना विनामूल्य पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण मिळणार * 21 ऑक्टोंबर रोजी पोलीस कवायत मैदानावर उपस्थित रहावे

अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांना विनामूल्य पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण मिळणार  
*  21 ऑक्टोंबर रोजी पोलीस कवायत मैदानावर उपस्थित रहावे      
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     सन 2021-22 मध्ये पोलीस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेतंर्गत मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शिख, पारसी, जैन आणि ज्यु या अल्पसंख्यांक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासना मार्फत विनामुल्य पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक समाजातील समाजातील उमेदवारांकडून जिल्ह्यातील प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी 21 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा पोलीस कवायत मैदान, बुलडाणा येथे अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
      प्रशिक्षणार्थीचे वार्षिक उत्पन्न 2.50 लक्ष पेक्षा जास्त नसल्याचा पुरावा असावा. उमेदवार हा अल्पसंख्याक समाजातील असावा. उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्ष वयोगटातील असावे. उमेदवाराची उंची 165 से.मी, महिला उमेदवार उंची 155 से.मी असावी. पुरूष उमेदवाराची छाती 79 से.मी व फुगवून 84 से.मी असावी. उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. उमदेवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता, आधार कार्ड, रहीवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातंर्गत नाव नोंदणी केलेला दाखला आदी कागदपत्रांच्या सत्यप्रती द्याव्या. उमेदवार हा शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा. निवडलेल्या उमेदवारांना एकूण दोन महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये दररोज तीन तासांचे वर्ग प्रशिक्षण व दोन तासांचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येईल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणादरम्यान 1500 रूपये प्रतीमाह प्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. तसेच मैदानी प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापाण, अल्पोपहार देण्यात येणार आहे. गणवेश साहित्यासाठी 1 हजार रूपये एवढे एकरकमी अनुदान देण्यात येणार आहे. निवडलेल्या प्रशिक्षणार्थीस निवासाची व्यवसथा स्वत: करावी लागणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविले आहे.