व्यसनमुक्तीची शपथ घेवून.....* जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रपित्याला अभिवादन

व्यसनमुक्तीची शपथ घेवून.....
* जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रपित्याला अभिवादन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    तंबाखु, सिगारेट यासह अन्य कोणतेही व्यसन न करता सकस आहाराचे सेवन व नियमित व्यायाम करून शरीर सदृढतेची शपथ घेत, जानेफळ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष युवा ठाणेदार राहुल गोंधे यांच्या कल्पक मार्गदशर्र्नाखाली शनिवार 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान लालबहाददूर शास्त्री यांची जयंती साजरी करून या महामानवांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाददूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर उपस्थित सर्व पोलीस कर्मचा-यांना व्यसन मुक्तीची शपथ प्रदान करण्यात आली. यावेळी ठाणेदार राहुल गोंधे, दुयम ठाणेदार संदिप सावळे, एएसआय भगवान शिंदे, हेकॉ अरविंद चव्हाण, हेकाँ प्रल्हाद टकले, पोकाँ राजीव गोंड, पोकॉ अमोल बोर्डे, अनंता कळमकर, विनोद फुपाटे, समाधान अरमाळ, दिलीप जाधव सह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.