रिसोड येथे 3 कोटी 45 लाखाचा गांजा ज़ब्त* आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील

रिसोड येथे 3 कोटी 45 लाखाचा गांजा ज़ब्त
*  आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील
बुलडाणा :(एशिया मंच वृत्त)
    गांजा या नशेच्या पदार्थाची रिसोड जि.वाशीम हदीतुन वाहतुक होत असल्याची गोपनिय माहीती नुसार  वाशीम जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंह  यांचे निर्देशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकार व त्यांचे पथक यांनी आज 18 ऑक्टोंबर रोजी हिंगोली ते रिसोड रोडवर सापळा रचून  एका  आयशर ट्रक क्रमांक एम एच-28बी बी-0867 याची झडती घेतली असता त्या मध्ये 3 कोटी 65 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली ते रिसोड रोडवर पोलीस निरीक्षक सारंग नवलकार व त्यांचे पथक यांनी गांज्याची वाहतुक होत  असल्याच्या  माहितीनुसार आयशर या मालवाहतूक ट्रकची चौकशी घेतली असता त्यामध्ये गांज्यासह चार जण ताब्यात घेण्यात आले.  या कारवाईत  गोटीराम गुरदयाल साबळे वय ५२ वर्ष रा.कुऱ्हा ता.मोताळ जि.बुलडाणा,  सिध्दार्थ भिकाजी गवांदे रा.निमगाव ता.नांदुरा जि बुलडाणा, प्रविण सुपडा चव्हाण रा.हनवतखेड ता.मोताळा जि.बुलडाणा, संदिप सुपडा चव्हाण रा.हनवतखेड ता.मोताळा जि.बुलडाणा असे आरोपीचे नाव आहे.
    सदर आयशर ट्रक मधुन ११ क्विंटल ५० किलो गांजा कीमत ३ कोटी ४५ लाख रुपये व आयशर ट्रक वाहन कीमत २० लाख रुपये असा एकुण ३ कोटी ६५ लाख रुपयाचा माल मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आला आहे. 
    सदर ची कारवाई मध्ये रिसोड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सारंग नवलकार पो उप नि संतोष नेमणार, psi शिल्पा सुरगडे, HC अनिल कातडे, Npc रंजवे,भागवत कष्टे,सुशील इंगळे,गुरुदेव वानखडे, यांनी सहभाग नोंदविला आहे.