चिखली : (एशिया मंच वृत्त)
तिन चार दिवस जोरधारांचा पाऊस कोसळ्याने परतिच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच जलाशय काटोकाठ भरले असुन चिखली शहराला पाणिपुरवठा करणारा पेनटाकळी प्रकल्प पुर्णपणे भरला आहे. या प्रकल्पाचे 29 सप्टेंबर बुधवारला विद्यमान नगर परिषद अध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोन्द्रे यांच्या हस्ते विधीवत जलपुजन करण्यात आले.
यावेळी त्याच्या समवेत भाजपा युवा नेते कुणाल बोन्द्रे, न.प.सभापती गोपाल देव्हडे, सौ.सिमाताई देव्हडे, पेनटाकळी प्रकल्पाचे शाख अभियंता अक्षय वचकल, भागवत काकडे, न.प.पाणिपुरवठा कर्मचारी रमेश गवई, खरात प्रामुख्याणे उपस्थित होते. यावेळी बोलतांना विद्यमान नगर परिषद अध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोन्द्रे म्हणाल्या की, आमच्या कार्यकाळात मागील 4 वर्षांपासुन पाणि पुरवठा विभागाचे काम दुष्काळग्रस्त स्थिती असतांनाही सुस्थितीत होते. आता या परतिच्या पावसामुळे पेनआकळी प्रकल्प 100% पुर्ण भरला असुन चिखली शहराला या पुढे पुर्वी प्रमाणेच नियमीत पाणिपुरवठा करण्याचा आमचा निश्चीत प्रयत्न राहील. या वेळी संबंधीत अभियंता व कर्मचारी यांनी प्रशासकीय बाबींची माहिती देत सांगीतले की विदद्यमान नगर परिषद अध्यक्षा सौ.प्रियाताई कुणाल बोन्द्रे यांच्या कार्यकाळात ज्या सुविधा प्राप्त झाल्या त्यामुळे चिखली शहराला नियमीत पाणि पुरवठा आतापर्यंत झाला व चिखली शहराला नियमीत पाणि पुरवठा करण्यासाठी आमचा प्रशायकीय वर्ग तत्पर राहील अशी ग्वाही दिली.
