* खडकपूर्णाचे 19 दरवाजे पूर्ण उघडले
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
गेल्या दोन दिवसांपासून जिल्हयात सर्वत्र पाऊस होत असून जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांच्या साठ्यात वाढ झाली आहे नदी नाले ओढे तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा संत चोखा सागर प्रकल्पाच्या जलसाठ्यात 96 टक्के च्या वर जलसाठा झाल्याने आज 28 सप्टेंबर रोजी दुपारी वाजताच्या सुमारास संपूर्ण 19 दरवाजे 1 मीटर ने उघडण्यात आले प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग 71486 क्युसेक्स ने होत असून नदीकाठच्या 33 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणातून 20 ते 30 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे तसेच पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करण्याचा निर्णय वेळेवर घेता येईल असे खडक पूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने सांगितले आहे खडक पूर्णा नदीचे दुथडी नदी पात्र तुडुंब भरून वाहत आहे प्रशासनाकडून दक्षता बाळगली जात आहे या प्रकल्पांतर्गत बुलढाणा हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील निमगाव गुरु, सावंगी टेकाळे, दिग्रस बुद्रुक, दिग्रस खुर्द, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागीले, निमगाव वायाळ, साठेगाव , हिवरखेड, राहेरी खुर्द, तळेगाव, राहेरी बुद्रुक, ताड शिवनी, देवखेड, पिंपळगाव कुडा, लिंगा, खापरखेडा, रायगाव, सावरगाव तेली, या गावांचा समावेश आहे तर जालना जिल्ह्यातील केरला, दुधा, सासव खेडा, लिमखेडा, हनुमंत खेडा, आस्वाद टाकळ, खोपा, इंचा, कानडी, देवठाणा, वाघाड या सह परभणी जिल्ह्यातील व सर भामटे, सायखेडा, हिंगोली, जिल्ह्यातील सेनगाव, तालुक्यातील धानोरा या गावाचा समावेश आहे संत चोखा सागर प्रकल्पाचे संपूर्ण 19 दरवाजे उघडल्याचे कळताच नागरिकांनी पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी प्रकल्पाकडे धाव घेऊन आनंद लुटण्याचा प्रयत्न केला.
यंत्रणा दक्ष नदीपात्रात सारखा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे असा इशारा देण्यात आला आहे जल प्रदाय विभाग तसेच संबंधित यंत्रणा दक्ष असून आपत्ती विभागाला देखील सूचना देण्यात आल्या आहेत आवश्यक ती कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत आहे जिल्हा प्रशासनाचे देखील घडत असलेल्या बाबींकडे लक्ष आहे पाण्याचा विसर्ग कमी-जास्त करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही पूर नियंत्रण कक्षाने म्हटले आहे.
