जेईई अँडव्हान्समध्ये ओम देशात २२३ वी रँक

जेईई अँडव्हान्समध्ये ओम देशात २२३ वी रँक
चिखली : (एशिया मंच न्यूज )
           तालुक्यातील एकलारा येथील ओम अनिल सिरसाट याने जेईई अँडव्हान्स परिक्षेत ओबीसी प्रवर्गातून देशात २२३ वी रँक मिळवली आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत ओम याने हे यश मिळवले असून शाळेचे व कुटूंबाचे नाव उंचावले आहे.
भारतात घेण्यात असलेल्या कठीण परिक्षापैकी एक परिक्षा म्हणजे जेईई अँडव्हान्स. यावर्षी जेईई मेन या परिक्षेसाठी देशात जवळपास 16 लाख विद्यार्थी बसले होते. जेईई मेन या परिक्षेच्या निकालानंतर अडीच लाख विद्यार्थ्यांची जेईई अँडव्हान्ससाठी निवड केली जाते. यावर्षी १७ मे रोजी झालेल्या परिक्षेमध्ये ओम सिरसाट याने घवघवीत यश मिळवून भारतातून ओबीसीमध्ये २२३ वी रँक मिळवली. यामध्ये त्याच्या जीवनात आलेला कठीण प्रसंग सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. 
        परीक्षेच्या काळात त्याच्या आईला स्क्रब टायफस या जीवघेण्या आजाराने ग्रासले. त्याची आई 17 ऑक्टोबर 2025 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत आयसीयूमध्ये होती. अशा अवस्थेतही त्याने मिळवलेले यश हे त्याची बुद्धिमत्ता आणि स्थिरतेचा परिचय देते. आजपर्यंत ओम याने शालेय जीवनात अनेक पुरस्कार मिळवले आहेत. ही परीक्षा त्याची जणू जीवनात परीक्षा घेणार होती. परंतु त्यातही तो यशस्वी झाला. त्याने मिळविलेल्या यशामुळे त्याचे सर्वांकडून कौतूक होत आहे.