सेवानिवृत्ती' म्हणजे आयुष्याच्या नव्या जीवनाची सुरवात : साबीर अली * प्रा. मो. शफीक यांचा सेवागौरव सोहळा


सेवानिवृत्ती' म्हणजे आयुष्याच्या   नव्या जीवनाची सुरवात : साबीर अली 
* प्रा. मो. शफीक यांचा सेवागौरव सोहळा 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        सेवानिवृत्ती ही जीवनातील एक महत्त्वाची घटना आहे, जी करिअरचा शेवट आणि नवीन अध्यायाची सुरुवात दर्शवते. सेवानिवृत्ती हा एक खास प्रसंग आहे, ज्यांनी आपले करिअर शिक्षणासाठी आणि असंख्य विद्यार्थ्यांची  मने तयार करण्यासाठी समर्पित केले आहे. परिणामी, सेवानिवृती दिवस हा उत्सव आणि आत्म-विश्लेषण या दोन्हीसाठी एक वेळ आहे, कारण ते अनेक वर्षाच्या मेहनती आणि समर्पणाचे प्रतिबिंबित करतात ज्यामुळे त्यांना या टप्प्यावर नेले, असे जेष्ठ पत्रकार साबीर अली यांनी प्राध्यापक मोहम्मद शफिक यांच्या सेवावृत्तीच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते. 
       उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे प्रा. मोहम्मद शफीक हे नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे सेवानिवृत्त झाले आहे, त्यानिमित्ताने त्यांचा 31 मे रोजी मिर्झा नगर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक  हारुन मास्टर, मो. इस्माईल, अतिकउल्लाह खान, साबीर अली यांची प्रमुख उपस्थिती होती 
   पुढे बोलताना साबीर अली म्हणाले की, कनिष्ठ महाविद्यालचे एक आदर्श प्राध्यापक मो. शफीक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात त्यांच्या भविष्याची पायाभरणी करण्यात त्यांनी अत्यंत मोलाचे कार्य केले आहे. या महत्त्वपूर्ण भूमिकेला, शिकवण्याच्या पद्धतीला अधिक प्रभावी बनवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती समजून घेण्याची क्षमता, त्यांच्यातील कमकुवतपणा ओळखून त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिले. सहज आणि सोपी शिकवण्याची पद्धतीने  शिकवणे.
     यावेळी हारुन मास्टर म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे,  मूल्यशिक्षण आणि शिस्त शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, नैतिक मूल्ये, शिस्त रुजवणे, जेणेकरून ते एक उत्तम नागरिक बनण्याचे कार्य मो. शफीक यांनी केले.
     सत्कारमूर्ती मो. शफिक यांनी सत्काराला उत्तर देताना असे सांगितले की,  मी या शाळेत जवळपास 35 वर्षापेक्षा जास्त सेवा दिलेली आहे. या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये मी कधीही दीर्घकालीन सुटी घेतलेली नाही. नोकरीवर लागल्यापासून माझे फक्त एकच ध्येय होते की, आपल्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे, ती लवकरात लवकर पूर्ण कशी होईल. आज मी शाळेतून मुक्त झालो असले तरी मी विद्यार्थीसाठी नेहमी उभा राहिल. मी केलेले सेवेबद्दल मला पूर्ण समाधान आहे. माझे वय 58 वर्षे पूर्ण झाल्यामुळे मी सेवानिवृत्त झालो. विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान न देता माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि समानतेची मूल्ये रुजवणे, असे सेवावृत्ती प्राध्यापक निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात सक्रिय राहून समाजाचा मोठा आधार बनू असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
     याप्रसंगी मिर्झा नगर येथील तौफिक खान, रिहान काझी, शेख युसूफ, मो.साजीद, शहादाब खान, अबूझएद खान, मुन्ना भाई, मो. ओसामा, गुफरान टेलर, झिया उल्लाह खान, काझी रईसोद्दीन, मो. दानीश. अब्दुल रऊफ यांच्यासह आदी  उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मो. इस्माईल यांनी केले.