* राजर्षी शाहू मल्टीस्टेटचा वरवट बकाल येथील ग्राहक मेळावा उत्साहात
संग्रामपूर : (एशिया मंच न्यूज )
घाटाखालील भागातील कृषी आधारित प्रकल्पांना भविष्यात अधिक पाठबळ देऊन शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले.
तालुक्यातील वरवट बकाल येथील राजर्षी शाहू मल्टिस्टेट शाखेचा ग्राहक मेळावा ३० मे रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर संग्रामपूरचे ठाणेदार बोपटे, सरपंच प्रतिभा इंगळे, पोलीस पाटील शुद्धोधन इंगळे, राम वनारे, श्याम कौलकर, स्वप्नील देशमुख, उषा धुळे, बळीराम धुळे, मनोज वाघ, सुभाष बकाल, बाळू ढोकणे, संदिप माठे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, राजर्षी शाहू मल्टिस्टेटने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यासोबतच
कोल्ड स्टोअरेज, ग्रीन गोदाम प्रकल्प,संत्रा प्रक्रिया उद्योग,
शेतकऱ्यांना बांधावर जाऊन खत वाटप, शेतकरी मार्गदर्शन शिबिरे, रक्तदान शिबिरे व विविध जनहिताच्या उपक्रमांमुळे संस्था समाजाशी घट्टपणे जोडली गेली आहे.संचलन व आभाराची जबाबदारी सेवानिवृत्त मुख्याध्यापक भोंडे यांनी पार पाडली. कार्यक्रमाला संचालक मंडळ, खातेदार, सभासद, ग्रामस्थ यांच्यासह सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, विभागीय व्यवस्थापक सतीश बोहरुपी, शाखा व्यवस्थापक वैभव आढाव, अश्विन परघलमोल यांची उपस्थिती होती.
* बचत गटांना धनादेश वितरित.....
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व स्थानिक संचालक मंडळाचा यावेळी सत्कार करण्यात आला. दहावीत उल्लेखनीय यश संपादन करणारी श्रुती चंद्रकांत ढोकणे व श्रेयस निवृत्ती बकाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एकलारा येथील महिला बचत गटांना कर्ज वाटपाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राजर्षी शाहू पतसंस्थेने अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन करून केलेल्या प्रगतीचे कौतुक केले.
