* नगराध्यक्ष व उपाध्यक्ष सह गटनेते यांच्या पुढाकाराने नियोजनबद्ध कामाला सुरुवात
दे. राजा : (एशिया मंच न्यूज )
पावसाळ्यात नाले व नाल्यातून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कुठेही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संपूर्ण शहराचा सर्वे करण्यात आला असून मान्सूनपूर्व शहरातील मोठे नाले व नाल्यांचे साफसफाईला युद्ध पातळीवर सुरुवात आज 25 मे रोजी करण्यात आली आहे. प्रत्येक कामावर नगराध्यक्ष माधुरी शिपने, उपाध्यक्ष वनीता भुतडा व गटनेते प्रदीप वाघ व या विभागाचे समिती सभापती संदीप शिंदे जातीने लक्ष देऊन देत असून नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेत आहे.
याबाबत वृत्त असे की, नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शहरातून वाहणारे सर्वच मुख्य नाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाईचे नियोजन करण्यात आले असून मोठ्या यंत्राच्या साहाय्याने युद्ध पातळीवर साफसफाईचे कामाला सुरुवात झालेली आहे. सोबतच सांडपाणी वाहून जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या सर्वच नाल्यांची साफसफाई सफाई कामगाराकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये व नाल्या ब्लॉक होऊन सांडपाणी रस्त्यावर नये याची दक्षता नगर परिषद प्रशासनाने घेतल्याची माहिती मुख्याधिकारी अरुण मोकळ, आरोग्य निरीक्षक जतीन नकवाल यांनी दिली असून नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते व आरोग्य समिती सभापती हे सर्व ह्या साफसफाईच्या कामाकडे जातीने लक्ष देत असून वेळोवेळी संबंधित यंत्रणा प्रमुखांना निर्देश देत आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा कचरा हा घंटागाडीतच टाकावा. तो नाल्यात वा रस्त्यावर टाकू नये व नगर परिषद प्रशासनाला सहकार्य करण्याचे, आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
