भोसले परिवाराने केली निराधार, उपेक्षितांची दिवाळी गोड


भोसले परिवाराने केली निराधार, उपेक्षितांची दिवाळी गोड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        समाजातील अनेक निराश्रित, निराधार व उपेक्षित लोक दिवाळी सणापासून वंचित राहतात. अशा वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी मुठे ले-आउट मधील भोसले परिवाराने सामाजिक उपक्रम राबवित समाजातील वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांना फराळ व मिठाईचे वितरण केले.
      गेल्या तेरा वर्षांपासून मुठे ले आऊट येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले हे प्रत्येक दिवाळीला शहरातील निराधारांना फराळ व विविध साहित्य वाटप करून त्यांची दिवाळी गोड करतात. याच अनुषंगाने यंदाही त्यांनी पुढाकार घेत समाजातील वंचित घटकांसोबत दिवाळी साजरी करीत त्यांना फराळ व मिठाईचे वितरण केले. बुलडाणा शहरातील संगम चौक, जयस्तंभ चौक, इकबाल चौक, बसस्थानक परिसर व मलकापूर रोड परिसरातील निराधाराना फराळ व मिठाईचे वाटप केले. यावेळी त्यांच्या सोबत अमृत पंडित, अमोल सोनुने, प्रवीण सोनुने, अजय जाधव, अमोल देशपांडे यांनी सहकार्य केले.