केनवड : (एशिया मंच न्यूज )
येथील सरपंच निताताई गोळे व नावलौकिक असलेले कबड्डीपटू गणेशराव गोळे यांची मुलगी सई गोळे हिने चमकदार कामगिरी बजावत शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य शालेय कबड्डी स्पर्धा कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडल्या, त्यातील १९ वर्ष वयोगटातील मुलींच्या संघातून स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोकलगाव, जिल्हा वाशिम संघाने गोल्ड मेडल मिळवले आहे. या संघाची प्रमुख खेळाडू असलेल्या सई गोळे हिने विरोधी संघावर वरचढ कामगिरी करीत आपल्या संघाला सुवर्ण पदक मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. या दैयदिप्य यशाबद्दल सईचे क्रीडा क्षेत्रात विशेष कौतुक होत आहे.
