बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
वर्धा येथील कुबेर मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवराज शिंदे यांनी 12 नोव्हेंबर रोजी राजर्षी शाहू मल्टीस्टेटला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्यासोबत सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा व अनुभवांची देवाणघेवाण झाली.
राजर्षी शाहू मल्टीस्टेटची विस्तारणारी कार्यव्याप्ती, विश्वासार्ह कार्यपद्धती आणि सहकार क्षेत्रातील वाढती ओळख यामुळे विविध भागांतील सहकार क्षेत्रातील मान्यवर संस्थेला भेट देऊन कार्याची माहिती जाणून घेत आहेत. याच अनुषंगाने गुरुवारी वर्धा येथील कुबेर मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवराज शिंदे व त्यांचे सहकारी वैभव पंधराम यांनी संस्थेला भेट दिली.
राजर्षी शाहू परिवाराच्यावतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ॲड. धीरजकुमार गोठी, संस्थेचे सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, गुंतवणूक अधिकारी सुशील गुळवे व गणेश काकडे यांची उपस्थिती होती.
