सुनील शेळके यांचा शेतकरी बांधवांशी संवाद

सुनील शेळके यांचा शेतकरी बांधवांशी संवाद
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      अभिता कंपनीचे सीईओ सुनील शेळके यांनी तालुक्यातील चांडोळ येथे शेतकरी बांधवांशी संवाद साधला. दुष्काळी परिस्थिती, रब्बी हंगामाचे नियोजन, भविष्यात उद्भवू शकणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई याबाबत चर्चा करण्यात आली. 
        अभिता ॲग्रो इंडस्ट्रिजच्या विविध उपक्रमांविषयी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतजमिनीच्या पोटखराब क्षेत्राच्या दुरुस्तीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि शेतीसमोरील आव्हाने जाणून घेत, शाश्वत शेती आणि ग्रामीण विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा हा संवाद महत्त्वपूर्ण ठरला. यावेळी परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.