मोताळ्यात शिवसेनेच्या वतीने ‘शेतकरी मदत केंद्रा’चे उद्घाटन
* शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत केंद्रातून मार्गदर्शन
मोताळा : (एशिया मंच न्यूज )
बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांच्या अडीअडचणींना तात्काळ मार्गदर्शन व मदत मिळावी, या उद्देशाने मोताळा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ‘शेतकरी मदत केंद्रा’चे उद्घाटन करण्यात आले.
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, राज्य पक्षप्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या हस्ते आज 7ऑक्टोबर रोजी मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या मदत केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती, पिकांचे नुकसान, पीकविमा तसेच अन्य कृषीविषयक समस्यांबाबत थेट मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे, हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ध्यास असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा समन्वयक गजानन धांडे, सुनीलभाऊ घाटे, मिलिंदभाऊ गवई, रमेश धुणके, मोहित राजपूत यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना सदैव बळीराजाच्या पाठीशी राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
