'गोरगरिबांच्या समर्पित सामाजिक कार्याला मत'!
* गुरुजी आणि शिवसैनिक दोघांनीही निवडणूक घेतली हाती!
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
प्रा. लहाने यांना दिलेले प्रत्येक मत हे केवळ एका राजकीय उमेदवाराला नसून, ते गोरगरिबांच्या आणि विविध सामाजिक प्रश्नांवर लढणाऱ्या सामान्य घरातील जमिनीवरील कार्यकर्त्याला दिलेले मत असल्याची भावना शिक्षकांमध्ये रुजली आहे. तळागाळातील शिवसैनिकांची मेहनत आणि जाणकार गुरुजींची साथ यामुळे ही निवडणूक गाजतेय. या निवडणुकीची संपूर्ण कमान दोघांनी आपल्या हाती घेतली आहे.अमरावती शिक्षक मतदार संघातील मतदार हे अत्यंत जाणकार आणि अभ्यासू आहेत. गुरुजींसारख्या सुजाण आणि विचारी मतदारांची जोड मिळाल्यामुळे प्रा. लहाने यांच्या पाठीमागे शिक्षकांची मोठी ताकद उभी राहिली असून, ही निवडणूक केवळ राजकीय न राहता एक सामाजिक चळवळ देखील बनली आहे.
अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे उमेदवार प्राध्यापक डी. एस. लहाने यांच्या उमेदवारीने निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. प्रा. लहाने हे राजकारणापेक्षा आधी एक समर्पित सामाजिक कार्यकर्ते आहेत. समाजसेवा आणि समाजकल्याण त्यांच्या रक्तात भिनलेले असून, कोणत्याही वैयक्तिक लाभाची वा परिस्थितीची परवा न करता ते अहोरात्र समाजकार्यात झोकून देऊन काम करतात. त्यांच्या याच निस्वार्थ स्वभावामुळे आणि सामाजिक तळमळीमुळे शिक्षक वर्गाकडून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची भावना व्यक्त झाली आहे.
जेव्हा - जेव्हा समाजातील उपेक्षित घटक, विशेषतः एकल महिला कार्यकर्त्यांना मदतीची गरज असते, तेव्हा प्रा. लहाने हे नेहमी पुढे येऊन त्यांच्या पाठीशी भाऊ म्हणून खंबीरपणे उभे राहिले आहेत. शिक्षकांच्या प्रश्नावरही त्यांनी अनेकदा रान उठवले आहे. त्यांनी दिलेला वचननामा असा की, त्याचा मोह अनेक उमेदवारांना व्हावा. आपल्या शिक्षण संस्थेत विधवांच्या मुलांना मोफत शिक्षण ते देतात. अशा निस्वार्थी आणि संवेदनशील कार्यकर्त्याला निवडणुकीच्या माध्यमातून साथ देणे हे समाज म्हणून आपलेही कर्तव्य ठरते, अशी भूमिका शिक्षक वर्गाकडून घेतली जात आहे. त्यांच्या याच जनहितकारी भूमिकेमुळे संपूर्ण मतदार संघात त्यांच्याविषयी मोठी सहानुभूती आहे. अशा व्यक्तीला मतदान नाही तर मग देणार कुणाला?
"प्रा. लहाने विधान परिषदेत जाणे म्हणजे सामान्य शिक्षक सभागृहात जाणे" असे आहे. प्राध्यापक लहाने यांचे विधान परिषदेत जाणे म्हणजे प्रत्यक्षात 'सामान्य शिक्षकाचाच विधान परिषदेतील प्रवेश असणे' अशी भावना आहे.
* शिक्षक आधी समाजावर प्रेम करतो!
शिक्षक हा नेहमी स्वतःच्या घरापेक्षा समाजावर आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर जास्त प्रेम करणारा घटक आहे. त्यामुळे सुजाण शिक्षक वर्ग स्वतःच्या हिताचा व हानीचा देखील समतोल राखून योग्य निर्णय घेत आहे. गुरुजन वर्ग प्रा. लहाने यांच्या या कार्याची गांभीर्याने दखल घेत असून, त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा याचे प्रमाण आहे.
